·
सोयरा परमेश्वर जोडा
·
सोयरा परमेश्वर जोडा नाहीतर घालील यम खोडा
·
सर्व धर्माचा कर त्याग | साधु संताचा धर संग
·
मनाचा सोडून दे हावडा | नाहीतर घालील यम खोडा ||१||
·
असावी शांतता मोठी नसावी कल्पना खोटी
·
करावा षड्रीपुचा रगडा | नाहीतर घालील यम खोडा ||२||
·
नकोबा गर्व अभीमान | म्हणे पार्थासी भगवान
·
नको करू पाखंडी झगडा | नाहीतर घालील यम खोडा ||३||
·
दयाळू परमेश्वर थोर | म्हणे हा दास भास्कर
·
झापडी नेत्राची उघडा | नाहीतर घालील यम खोडा ||४||
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा